पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्यात, यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिबांच्या स्मृतिदिनी म्हणजेच २४ जूनला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला असून गुरुवारी न्हावे येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या करिता २४ जूनला आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहेत. या बैठकीमध्ये भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, किशोर पाटील, सुधिर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, सी. एल. ठाकूर, सदाशिव ठाकूर, तुकाराम मोकल, आनंता ठाकूर, रामदास ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मागील काही दिवसामध्ये खारघर येथील ओवेपेठ आणि वळवली येथेही ही जानजागृतीपर बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; गावोगावी बैठका !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




