जॉइंटमधील रबर आणि काँक्रीट भरण्याची विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी !
पनवेल : ठाणा नाका येथून खांदा कॉलनी येथे जाताना रेल्वेचा उड्डाणपूल आहे. त्या पुलावर ठाणा नाका ते खांदा कॉलनी येथे जाताना 9 आणि खांदा कॉलनी येथून ठाणा नाका येथे येताना 9 असे एकूण 18 एक्सपान्शन जॉइंट आहेत. त्यातील काही जॉइंट मधील रबर आणि काँक्रीट निघाल्यामुळे तेथे खड्डे पडले आहेत. तेथून रहदारी करणाऱ्या वाहनचालकांना त्यात मुख्यत्वेकरून दुचाकी आणि रिक्षाचालकांना त्रास होत आहे. पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकारयासोबत बोल्ने करून काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.
याठिकाणी नुकतेच सदर खड्डा लक्षात न आल्यामुळे अचानक ब्रेक दाबून रिक्षा थांबल्याने तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित एमएसआरडीसी विभागातील अधिकारी सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्या विभागात रस्ता मेंटेनेसचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून सदर विषयाची माहिती घेऊन त्यांना नागरिकांची समस्या दाखवली. यावेळी सदरचे काम मेंटेनेसमध्ये येत नसल्यामुळे आम्ही केले नाही यासाठी वेगळे कामाचे ॲप्रुवल घेऊन आम्ही काम पूर्ण करू असे उपस्थित असणाऱ्या अधिकार्यांनी सांगितले. यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना रस्ता सुरळीत प्रवासासाठी मोकळा करुन द्यावा असे निर्देश दिले. यासाठी त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करण्यात येईल असे सांगितले.