Press "Enter" to skip to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती खारघर येथे मोठ्या उत्साहात साजरी !

पनवेल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती खारघर सेक्टर ११ येथे शिवशंबो सोसायटीजवळ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व बुद्ध वंदना घेवून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
यावेळी नरेश ठाकूर ( स्थायी समिती सभापती ), ब्रिजेश पटेल (खारघर भाजपा अध्यक्ष), कीर्ती नवघरे ( सरचिटणीस खारघर भाजपा), बिना गोगरी, मोना अडवाणी आदि मान्यवर उपस्थित होते.
भाजप खारघर तळोजा मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतीक्षा मंगेश कदम, नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी आशा शेंडगे , तुकाराम कंटाले, गीता चौधरी, मोना आढवानी, राजेंद्र प्रभू, रोहिणी आमराळे, सुधाम कदम, सदाभाऊ शिरसकर, कालिदास देशमुख,प्रभाकर बांगर, घाडगे काका, अशोक शिंदे,चंदनशिवे काका, प्रदीप सुर्वे, अशोक कडू , रामदास मांधले व अनेक नागरिक उपस्थित होते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिषेक इंगळे, निलेश नायकवाडी, अजय इंगळे, नंदू गोसावी,अंकुर शर्मा, स्वप्नील शेंडगे, अमित शेंडगे,अजय गर्जे, बंटी कांबळे,रोहन कदम, शुभम कांबळे, सुनील भुजबळ, किशोर क्षीरसागर, यश साळवे, रोहित शिंदे, अमित गांगुर्डे, जयेंद्र साळवे, सुजित लावंगरे, प्रफुल्ल चंदनशिवे, संकेत केदारे, प्रसाद सूर्वे, बंटी कदम, मुकेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.