Press "Enter" to skip to content

इम्तियाज शेख यांची खारघर उपशहरप्रमुख पदी निवड !

पनवेल : शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते इम्तियाज शेख यांची खारघर उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नुकतेच शेख यांना नियुक्तीपत्र देऊन उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
मागील अनेक वर्षांपासून इम्तियाज शेख सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. शिवसेनेत काम करताना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम राबवून शिवसेना पक्षवाढीत योगदान देत आहेत. इम्तियाज शेख यांची पक्षनिष्ठता आणि सामाजिक कार्यातील सातत्य पाहून शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी इम्तियाज शेख यांच्यावर खारघर उपशहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
यापूर्वी इम्तियाज शेख हे शिवसेना विभाग प्रमुख म्हणून सक्रिय होते.

नवनियुक्त खारघर उपशहरप्रमुख इम्तियाज शेख यांना नियुक्तीपत्र देताना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »