Press "Enter" to skip to content

संबंधितांवर कारवाई करा अन्यथा , राजीनामे देऊ – मंगेश रानावडे !

पनवेल : आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि रायगडजिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर शहरात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. विविध सामाजिक उपक्रम राबवून खारघरमधील जनतेपर्यंत पोहचण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. याच सामाजिक भूमिकेतून २६ फेब्रुवारी रोजी शिवसेना रोजगार मेळाव्याचे आयोजन खारघर येथे केले. मात्र, बॅनरवर फोटो लावला नाही, म्हणून आमच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला, शिवसेना पक्षाच्या तत्वांच्या विरोधात हि बाब असून पक्ष श्रेष्ठींनी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खारघर उपशहरप्रमुख मंगेश रानावडे आणि शिवसेना विभागप्रमुख इम्तियाज शेख यांनी आज खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

अन्यथा, आम्ही शिवसेना पक्ष पदाचे आणि सदस्यत्वाचे राजीनामे देऊ, अशी ठाम भूमिका देखील शिवसेना खारघर उपशहरप्रमुख मंगेश रानावडे आणि शिवसेना विभागप्रमुख इम्तियाज शेख यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पक्ष श्रेष्ठींनी पुढील सात दिवसात आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत पक्ष श्रेष्ठी शिवसेनेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत ,अशी भावना यावेळी शिवसेना खारघर उपशहरप्रमुख मंगेश रानावडे आणि शिवसेना विभागप्रमुख इम्तियाज शेख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »