Press "Enter" to skip to content

मराठा समाजाच्या वतीने खारघर येथे `एक शहर, एक शिवजंतीची मुहूर्तमेढ !

पनवेल : खारघर शहरातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, खारघरमध्ये सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी मराठा समाज खारघरच्या वतीने यावर्षी एक शहर एक शिवजयंतीची मुहूर्तमेढ रोवली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत खारघर सेक्टर १२ उत्कर्ष हॉल आणि सेक्टर १५ येथील मैदानात भव्य-दिव्य आयोजनाने नवी मुंबईतील सर्वात मोठी जयंती साजरा करण्यात आली. मराठा समाज खारघर संस्थेचे अध्यक्ष कालिदास देशमुख, सचिव माधव शिंदे, खजिनदार अलका कदम, उपाध्यक्ष शांताराम सुर्वे, ज्ञानदेव नवले, सहसचिव स्वप्नील काटकर, सहखजिनदार सुनील भोईटे, मुख्य सल्लागार प्राचार्य बी ए पाटील, संयोजक अर्जुन गरड आदींनी विशेष मेहनत घेतली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे खारघर सेक्टर १५ येथील मैदानात केलेल्या भव्य -दिव्य आयोजनात नगरसेविका लीना गरड, सामाजिक कार्यकर्ते मधू पाटील, ऍड बालेश भोजने, सामाजिक कार्यकर्त्या अनिता भोसले यांनी विशेष योगदान दिले.