नवी मुंबई : आरंभ बहुउद्देशीय सेवा संस्था सानपाडा,या संस्थेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक अंकुशराव गावडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, अल्प दरामध्ये ऑपरेशन तसेच न्यू मिलेनियम हॉस्पिटलचे डिस्काउंट कार्ड , अशा विविध समाजोपयोगी विधायक कार्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी गजरे, सुचिता वारुळे,कोषाध्यक्ष रेश्मा सुर्वे, उपाध्यक्ष श्रीमती शरयु वाघ, सदस्य दिव्या मोरे, सदस्य संदीप वारुळे, मार्गदर्शक वैभव डुबल यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सानपाडा तालुका अध्यक्ष, रवींद्र ढोबळे, युवा नेते शुभम भालेराव, विकास साहेब, असंघटित कामगार महिला अध्यक्षा सुनिता निकम, नंदा डेरे मॅडम, निर्मला वायकर मॅडम, मॅडम, संगीता बोराडे मॅडम, नंदा डेरे मॅडम, नंदा डेरे मॅडम, सीमा पाटील मॅडम, जयश्री आहेर मॅडम या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या हस्ते पदनियुक्तीपत्र देऊन बेलापूर असंघटित कामगार महिला अध्यक्षा शुभांगी गजरे, तालुकाध्यक्ष सौ कुसुम कांबळे आणि तालुका सचिव सौ शबाना शेख या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.सदर कार्यक्रम सानपाडा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या व महिला सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आरंभ संस्थेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक अंकुशराव गावडे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !




