पनवेल : एकीकडे कंपन्या बंद पडत चालल्या आहेत, परंतु ह्याच परिस्थितीत कंपनीबरोबर कामगारही टिकला पाहिजे या हेतूने योग्य सांगड घालत कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल तीन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार आज करण्यात आले.
बकुल ऍरोमॅटीक्स रसायनी मधील कामगारांसाठी ७६००/- रुपये तर मॅग्नम ट्रेडर्स चिंचवण मधील कामगारांसाठी ५०००/- व मास्टर मरीन सर्व्हीसेस (PUB व CMA) मधील कामगारांसाठी ४०००/- पगारवाढीचे करार करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस श्री. वैभव पाटील उपाध्यक्ष श्री. संजय ठाकूर, संघटक श्री. योगेश रसाळ, श्री. विवेक म्हात्रे, श्री. उत्तम पाटील, श्री. आनंद ठाकूर तर बकुल व्यवस्थापनाचे श्री. गजानन गायकवाड, श्री. दिलीप पै तर मास्टर मरीन सर्व्हीसेसचे सौ. बिंद्रा देवराजन, श्री. नंदकुमार बने, श्री. विलास शिरोळे, मॅग्नम ट्रेडर्सचे डायरेक्टर श्री. अनिल खुबचंदानी, श्री. ज्ञानदेव जाधव तर कामगारांतर्फे श्री. परेश थळी, श्री. चेतन खाने, श्री. अक्षय म्हात्रे, श्री. प्रसाद खाने, श्री. प्रतिक खाणे, श्री. महेश घरत, श्री. जगदीश चौधरी, श्री. दत्ता ठोंबरे उपस्थित होते.





