Press "Enter" to skip to content

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत म्हणजे कर्तव्य जपणारा बापमाणूस ! पायावर शस्त्रक्रिया होवूनही समाजकारणात सक्रिय !

पनवेल : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली, त्यानंतर आता आणखी एक शस्त्रक्रिया पार पडली, मात्र आपले दुखणे बाजूला ठेवून घरत हे जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी त्याच जोमाने कार्यात गुंतले असल्याचे समोर आले. तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मनातील शंका, अडचणी दूर करून त्यांच्यामध्ये उत्साह वाढविण्याचे काम ते घरातून करीत असल्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असावा हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची रीघ शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात लागली आहे. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पायावर लागोपाठ दोनदा शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांनी आपल्या जबाबदारीतून माघार न घेता ती लीलया पेलली आहे. आजही शिरीष घरत हे आपल्या निवासस्थानातून कार्यकर्त्यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत आहेत. वरिष्ठ पातळीवरील अडचणी नेत्यांशी संपर्क, अधिकाऱ्यांशी संपर्क करून सोडविण्यासाठी सकाळपासून नेहमीप्रमाणे ते काम करीत आहेत.

नुकत्याच स्वयंरोजगार या विषयावर तरुणांना व्यावसायिक संधी देण्यासाठी सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देवून तरुणांना पायावर उभे करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी हातात घेतला. त्यामुळे शिवसैनिक म्हणून कसे काम केले पाहिजे हे त्यांनी आजारपणातही दाखवून दिले आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर नुकतेच त्यांच्या निवासस्थानी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, शाखाप्रमुख वैभव दळवी आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देवून पुढील नियोजनावर चर्चा केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »