Press "Enter" to skip to content

महा-राष्ट्र विकास अघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी मल्लिकार्जुन पुजारी !

नवी मुंबई : महा-राष्ट्र विकास अघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नवी मुंबईतील जेष्ठ नेते मल्लिकार्जुन पुजारी यांची निवड करण्यात आली आहे. महा-राष्ट्र विकास अघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील यांनी नुकतीच मल्लिकार्जुन पुजारी यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी महा-राष्ट्र विकास अघाडीचे मुख्य महासचिव अनिरुद्ध येचाले उपस्थित होते. त्याचबरोबर श्री पुजारी यांच्यावर मुंबई व ठाणे जिल्हा प्रभारी पदाची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पक्ष असलेला महा-राष्ट्र विकास अघाडी पक्ष वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष होता. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संपूर्ण राज्यात पक्ष संघटना बांधणीवर भर दिला आहे. त्या अनुषंगाने श्री पुजारी यांच्यावर महाराष्ट्रासह मुंबई व ठाणे जिल्ह्याची विशेषत्वाने जबाबदारी दिली आहे. श्री. पुजारी हे ठाणे व नवी मुंबईतील जेष्ठ राजकारणी असून मागील लोकसभा निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीचे ठाणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार होते.
आगामी काळात पनवेल , नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबईत जिल्हयात पक्षाची जोरदार बांधणी करणार , असा विश्वास यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »