Press "Enter" to skip to content

पालिका क्षेत्रात स्वच्छता मार्शल तैनात होणार !

पनवेल : महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम अधिक सक्रिय राबविण्यासाठी स्वच्छता मार्शल तैनात करणेकामी प्राप्त झालेल्या दरांस स्थायी सभेने मान्यता दिली.

पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन सभा आज(22 ऑक्टोबर) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सचिव तिलकराज खापर्डे तसेच स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

महापालिकेकरिता कोविड 19 कामी महापालिकेचे मंजूर ठेकेदार जे.के. टुरिस्ट ॲण्ड ट्रान्सपोर्ट यांचेमार्फत वाहने भाडेतत्वावर घेणेकामी करण्यात आलेला खर्चास मान्यता देण्याचा विषयास मंजूरी स्थायीने मंजूरी दिली. पनवेल महापालिकेला कंत्राटी तत्वावर कर्मचारी वर्ग पुरविणारी बाह्ययंत्रणा मे. गुरूजी इंन्फ्रास्ट्रक्चर यांना एका वर्षाकरिता मुदतवाढ देण्याच्या विषयास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा विभागातील विद्युत पंपाची सर्व्हिर्सिंग व दुरूस्ती करण्याच्या कामास स्थायीने मंजूरी दिली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील निरनिराळ्या जागी रस्ते दुरूस्त करण्याच्या कामाकरिता वाढीव खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव तसेच पनवेल महापालिकेस विविध क्षमतेच्या पथदिव्यांचा दोन वर्षाकरिता पुरवठा करणे कामी न्यूनतम निविदेस स्थायी समितीने मान्यता दिली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »