पनवेल : बेलपाडा-खारघर येथे राहणाऱ्या अनुसया किसन पाटोळे यांचे 12 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) तालुक्यातील खरोशी हे त्यांचे मुळ गाव असून मागील अनेक वर्षांपासून त्या बेलपाडा खारघर येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्य करीत होत्या.
त्यांच्या पश्चात्य मोठा मुलगा भीमराव किसन पाटोळे, लहान मुलगा विलास किसन पाटोळे, मुलगी सिंधुताई उत्तम शिंदे आणि नातू संतोष भीमराव पाटोळे व नात भाग्यश्री भीमराव पाटोळे, अक्षता भीमराव पाटोळे असा परिवार आहे.