नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आपत्काळामध्ये निःशुल्क रुग्णवाहिका सेवा पुरवण्याची घोषणा केली आहे, ही सेवा नवी मुंबई शहर सीमांच्या आत उपलब्ध असेल. मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना कोणत्याही प्रकारची आणीबाणी उद्भवल्यास रुग्णवाहिका मिळवण्यासाठी वेळ वाया घालवावा लागणार नाही. फक्त १०६६ क्रमांकावर फोन करून अपोलो हॉस्पिटल्स डेडिकेटेड इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (ईआरएस) चा लाभ घेता येईल. आधुनिक जीपीआरएस-सक्षम रुग्णवाहिका तातडीने पाठवली जाईल. ही रुग्णवाहिका प्रशिक्षित पॅरामेडिक्ससह आवश्यक क्रिटिकल केयर उपकरणांनी सुसज्ज असेल. आणीबाणीच्या प्रसंगामध्ये सर्वात महत्त्वाचे असते वेळ वाचवणे आणि २४X७ ईआरएसमुळे वैद्यकीय मदत अगदी सहज आणि रुग्णाची तब्येत अधिक जास्त खालावण्याच्या आधी मिळवता येईल व दुर्दैवी घटना टाळता येतील.

नवी मुंबईकरांसाठी मोफत आपात्कालिन रुग्णवाहिका सेवा ! अपोलो मार्फत १०६६ क्रमांकावर २४X७ सेवा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !




