Press "Enter" to skip to content

स्वच्छ नवी मुंबई च्या शिल्पकारांना आप नवी मुंबईची अनोखी मानवंदना !

नवी मुंबई : सातत्याने नवी मुंबईला स्वच्छ शहर, पुरस्काराचा मान मिळवून देणारे, ह्या पुरस्काराचे खरे हकदार, स्वच्छता कर्मचारी, ह्यांचा आम आदमी पार्टी नवी मुंबई, कार्यकर्त्यांकडून, दरवर्षी प्रमाणे सत्कार १० लाख ते ४० लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांसाठी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्यावतीने केल्या गेलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ स्पर्धेमध्ध्ये प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई ला मिळाला. ह्या पुरस्कारासाठी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त श्री अभिजित बांगर ह्यांचे, आम आदमी पार्टी नवी मुंबई कडून मनपूर्वक अभिनंदन.
तसेच, सातत्याने नवी मुंबईला हा पुरस्काराचा मान मिळवून देणारे, ह्या पुरस्काराचे खरे हकदार, म्हणजे स्वच्छता कर्मचारी, ह्यांचा आम आदमी पार्टी नवी मुंबई, कार्यकर्त्यांकडून, दरवर्षी प्रमाणे, सकाळी सहा वाजता, कोपऱखेरने येथील निसर्ग उद्यान डम्पिंग ग्राउंड येथे जाऊन फुले देऊन सत्कार करण्यात आला. ह्या पुरस्काराबद्दल सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणी सातत्याने स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाऱ्या ह्या आधुनिक शहराचा नागरिक असल्याचा मला आभिमान आहे – श्यामभाऊ कदम, कार्यकारी अध्यक्ष – आप नवी मुंबई.
कोरोना काळात आपलं जीव धोक्यात असतानां देखील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वच्छ सेवकांना सलाम . – नीना जोहरी, वॉर्ड ४२ अध्यक्ष आणी सह सचिव – युवा सक्षमीकरण– आप नवी मुंबई. आपल्या नवी मुंबई च्या सफाई साठी अव्याहतपणे काम करीत राहणारे आपले स्वच्छता कर्मचारी, जर कोठेही आपल्याला दिसल्यास प्रत्येक नवी मुंबईकरांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. – सुमित कोटियन, वॉर्ड ३८ अध्यक्ष आणी युवा अध्यक्ष – आप नवी मुंबई.
ह्या पुरस्काराचे खरे शिल्पकार,स्वच्छता कर्मचारीच आहेत – चिन्मय गोडे, वॉर्ड ९१ अध्यक्ष आणी युवा अध्यक्ष – आप नवी मुंबई. ह्या प्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सुध्दा , आप नवी मुंबईचे आभार व्यक्त केले. तसेच ह्या सत्कारासाठी आप नवी मुंबईचे कोपऱखेरने टीमचे नेते सुमित कोटियन, नीना जोहरी, कौशलसिंग ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.