नवी मुंबई : एकविसाव्या शतकातले अत्याधुनिक, औद्योगिक शहर त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रमाने आपला नावलौकिक जगभर मिळवणारे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. खऱ्या अर्थाने नव्या मुंबईला घडवणारे लोक कामगार आहेत. या कामगारांच्या हातावर नवी मुंबई उभी झाली, स्वच्छतेच्या बाबतीत नवनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे त्यासाठी झटणारे चतुर्थश्रेणी सफाई कामगार, मजूर असे लाखो लोक बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे आहेत, नवी मुंबईतला बहुतांश समाज मध्यमवर्गीय आहे व वाशी सेक्टर 10 येथील रुग्णालया चा उपभोक्ता दलित, शोषित, पीडित, मजूर वर्ग, गरीब वर्ग असल्याने व बाबासाहेब आंबेडकर गोरगरिबांचे कैवारी हे समीकरण जुळत असल्याने त्यांचे नाव रुग्णालयास देणे म्हणजे दिन दलितांचा, गरिबांचा गौरव केल्यासारखे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नवी मुंबई मधील ऐरोली, नेरूळ येथे जे शासकीय सार्वजनिक रुग्णालय आहेत, त्या सर्वांना नाव दिले गेले आहेत परंतु वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाला अद्यापही नाव देण्यात आले नसल्याने ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या मागणीचे निवेदन उपआयुक्त पी. ए. चाबुकस्वार यांना देण्यात आले. लोकभावनेचा आदर करीत मागणीचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, यासाठी महापालिकेने एक आठवडा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम देण्यात आला अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी किशोर औसरमल (ऑल इंडिया पँथर सेना, नवी मुंबई. अध्यक्ष) दीपक भाऊ वंजारी (नवी मुंबई उपाध्यक्ष), सुनील भाऊ निंबोळे (नवी मुंबई युवा अध्यक्ष), सतीश भावरे (नवी मुंबई सचिव) महादेव गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.