Press "Enter" to skip to content

भाजप शिष्टमंडळाने घेतली पालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट !

पनवेल : भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडलाचे पदाधिकारी उपाध्यक्ष दिलिप जाधव, सरचिटणिस दिपक शिंदे, युवा मोर्चा सरचिटणिस अमर उपाध्याय, सुमित सहाय व नगरसेविका हर्षदा उपाध्याय आदींचे शिष्टमंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या खारघर येथील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी येथील वैद्यकिय अधिकारी डाँ. अश्विनी देवगावकर यांच्याशी मलेरिया व विशेष करुन डेंग्यूच्या रुग्णसंख्या व औषधोपचारा विषयी चर्चा केली. महापालिकेतर्फे धुरिकरण,सर्व्हेलंस,स्पाँट व्हिजीट व औषधोपचार इ.उपाय योजना डेंग्यूच्या नियंत्रणा साठी चालू आहेत असे डाँक्टरांनी सांगितले.
डेंग्यू नियंत्रणात योग्य निदान व जलद निदान अत्यंत महत्वाचे असते.त्यासाठी लागणारे अँटिजन +अँटिबाँडी काँम्बो कार्ड टेस्ट आरोग्य केंद्रात उपलब्ध असावेत अशी मागणी शिष्टमंडळा तर्फे करण्यात आली आहे.काहि दिवसांतच असे जलद निदान करणार्‍या कार्ड स्टेट किटस् उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ वेद्यकिय अधिकारींशी बोलू असे वैद्यकिय अधिकार्‍यांमार्फत सांगण्यात आले.सरत्या पावसांच्या काळात साचलेल्या डबक्यात एडिस डासाची पैदास वाढल्याने डेंग्यूचा प्रसार वाढण्याची शक्यता वाढते.वेळीच उपाय योजना केल्यास प्रसार रोखणे शक्य होते.