Press "Enter" to skip to content

बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई !

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत असून आज बेलापूर विभाग कार्यालयांतर्गत असलेल्या सेक्टर-36, करावेगांव येथील 2 बांधकामे नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होती. या अनधिकृत बांधकामांस बेलापूर विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधीताने केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले.

  या अनधिकृत बांधकामांवर बेलापूर विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, 15 मजुर, 01 मुकादम, 01 गॅसकटर, 02 इलेक्ट्रीकल हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.

  यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.