Press "Enter" to skip to content

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचा जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न !

नवी मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि.),नवी मुंबई, संस्थापक अध्यक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप यांच्या वतीने जीवनगौरव तसेच समाजभूषण पुरस्काराने समाजातील धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, कला या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना कोविड चे नियम पाळून एम.टी.डी.सी.खारघर येथे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी द ओरिजनल मेस्ट्रो संस्थेद्वारे जगभरातील सुप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अप्रतिम प्रतिमांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते.
अत्यंत दिमाखात यंदाचे ११ वे वर्ष साजरे झाले.प्रत्येक क्षेत्रातील मातब्बर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली.पुरस्कार विजेत्या सर्व मान्यवरांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुबक प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.अनेकांना पुरस्कार स्विकारताना गहिवरून आले.रात्री उशिरापर्यंत चाललेला पुरस्कार सोहळा संपेपर्यंत कोणीही जागेवरून उठले नव्हते हे ह्या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील ही व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वर्षभरातील कार्याचा आढावा घेऊन,कोणताही प्रस्ताव न मागवता,कोणतीही फी न घेता ही समिती गेले १० वर्ष हा सोहळा यशस्वी करत आहे. यंदाचे हे ११ वे वर्ष. यामध्ये उमाकांत रणधिर.(जेष्ट पँथर नेते) तसेच सयाजी वाघमारे ( संस्थापक मागास वर्ग विक्रीकर अधिकारी कर्मचारी संघटना आणि रिपब्लिकन नेते) यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले.तर समाजभुषण पुरस्काराचे मानकरी आहेत प्रा.डाँ.आद.दादाराव म्हस्के (सांस्कृतिक),आद.निताताई आडसुळे (सामाजिक), राजेश चिखलकर (प्रसिद्ध ढोलकीटपटू), राहुल सातपुते (सक्षम फांऊडेशन), चरण जाधव (लेखक-कवी), कांचन भालेकर (युवा-उद्योजिका),आद.भटु बागले (चित्रकार), अभिमान जगताप (सामाजिक), विवेक मोरे (कवी), दादाभाऊ अंभग (जेष्ट पत्रकार), निलेश मंडलेचा.(प्रसिध्द समुपदेशक), डाँ.शैलेन्द्र घोडके (मानसशास्त्रज्ञ), कुशल कोळी (अभिनेता), नीलकंठ वाघमारे (उद्योजक), कोमल धांडे(अभिनेत्री), वंदना सोंलकी(उद्योजिका), स्वामी वैदु (सामाजिक) तर विशेष पुरस्कारामध्ये
प्रवीण गांगुर्डे (जागतिक दर्जाचे चित्रकार), मिलिंद इनामदार (सरकार) आणि विद्याताई गायकवाड (कार्यसम्राट नगरसेविका-पनवेल महानगरपालिका) यांचा सन्मान करण्यात आला.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून निर्माण झालेल्या ह्या सोहळ्याचे सर्वेसर्वा असणारे संस्थापक अध्यक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप यांनी राबवलेला सन्मान सोहळा खरेच वाखाण्याजोगी असल्याची भावना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.