पनवेल : पनवेल मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ मधील मुर्बी गावामध्ये कोविड लसीकरण शिबीर संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृहनेता परेशशेठ ठाकूर यांच्या सहयोगाने मुर्बी गावातील ग्रामस्थांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर ३३० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. अशी, माहिती माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी दिली.