- डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या सहकार्याने शिव प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आयोजन ! गौरा गणपती उत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन ! नागरिकांनी रक्तदान करावे ! शत्रुघ्न काकडे यांचे आवाहन !
पनवेल : महानगरपालिकेचे माजी सभापती तथा खारघर प्रभाग क्रमांक ५ मधील स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गौरा गणपती उत्सवानिमित्ताने बेलपाडा- खारघर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ येथील डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या सहकार्याने बेलपाडा येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात आज संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या डॉ प्राची नायर तसेच बेलपाडा ग्रामस्थ, कार्यकर्ते, रक्तदाते उपस्थित होते.
बेलपाडा खारघर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गौरा गणपती उत्सवाची परंपरा मागील ११ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी दिली. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होत आहे, त्यामुळे सामाजिक जबाबदारीतून गौरा गणपती उत्सवानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केल्याची प्रतिक्रिया यावेळी शत्रुघ्न काकडे यांनी व्यक्त करीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन केले.