खारघर येथे महिनाभर सुरू असलेल्या शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !
नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजवावा ! भाजपनेते समीर कदम यांचे आवाहन !
पनवेल : नगरसेविका संजना समीर कदम यांच्या पुढाकाराने खारघर प्रभाग क्रमांक ६ येथील भाजप कार्यलयात महिनाभरापासून मतदार नाव नोंदणी शिबीर सुरू करण्यात आले आहे.
खारघर येथे महिनाभर सुरू असलेल्या शिबिरात अनेकांनी लाभ घेतला लाभ असून ३० सप्टेंबरपर्यंत खारघर सेक्टर १८ येथील कार्यालयात शिबिर सुरू राहणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन भाजपनेते समीर कदम यांनी केले आहे.






