नवी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ सप्टेंबर रोजी सिडको महामंडळाचे मुख्यालय असलेल्या, नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनला भेट देऊन नवी मुंबईतील विविध नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.
“मी सिडकोच्या संदर्भातील सर्व मुद्दे व बाबी त्याचप्रमाणे नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात विस्तृत माहिती घेतली. याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.”
अजित पवार,
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र राज्य, सुनिल तटकरे, लोकसभा सदस्य, शशिकांत शिंदे, विधानसभा सदस्य, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, विलास पाटील, विभागीय आयुक्त, कोकण, बिपिनकुमार सिंग, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका, राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे, डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड, शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, लोकप्रतिनिधी आणि सिडकोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.





