पनवेल : पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग ६ मधील स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांच्या माध्यमातून वास्तुविहार के एच २ को ऑप हौसिंग सोसायटी , पारिजात को ऑप हाऊसिंग सोसायटी, वास्तुविहार के एच १ को ऑप हौसिंग सोसायटी, परिसरातील सर्व सोसायटीतील गणेशोत्सव मंडळांना दीपज्योति (समई) वाटपाच्या उपक्रमाची सुरवात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सदस्य प्रशांत कदम, पनवेल शहर सचिव प्रदीप देशमुख, देविदास खेडकर त्याचप्रमाणे वास्तुविहार के एच २ को ऑप हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष समीर कदम, सचिव अरुण म्हात्रे, खजिनदार अजिनाथ वायभासे, उत्सव समितीचे सचिव मोहन मोरे, आदिनाथ डमाळे, युवा मोर्चा पदाधिकारी सुशांत पाटोळे, प्रथमेश मोरे, अविनाश नलावडे,व पारिजात को ऑप हौसिंग सोसायटीच्या वतीने विकास येवले, जयवंत कुंभार, प्रकाश ओव्हाळ, दिगंबर कदम, बंदरकर काका, अधिक भोईटे, श्रीकांत चव्हाण, नानासो खोपडे,व पारिजात सोसायटीतील सर्व महिला मंडळी तसेच वास्तुविहार के एच वन को ऑप हाऊसिंग सोसायटी सुधीर सावंत, बाळासो हिनुकले,भिवाजी शिंदे, राजेश शर्मा व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






