Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी पनवेल शहरजिल्हा रोजगार विभाग अध्यक्षपदी संतोष शेट्टी यांची निवड !

पनवेल : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. खासदार सुनील तटकरे, युवकनेते पार्थ पवार, पालकमंत्रीआदितीताई तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, डॉ. ओमकार माळी, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस व रोजगार स्वयंरोजगार विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने संतोष शेट्टी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहरजिल्हा युवक रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्यध्यक्ष शिवादास कांबळे, प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे, प्रमोद बागल अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा युवक , शहबाज पटेल जिल्हा युवक कार्याध्यक्ष, मंगेश नेरुळकर जिल्हा युवक कार्याध्यक्ष, बळीराम नेटके अध्यक्ष बळीराम नेटके खारघर शहर आदी उपस्थिती होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »