पनवेल : तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना? मग तुमचा बाप्पा बरोबरचा सेल्फी पाठवा आणि मिळवा बक्षिसं. दिनांक १० ते २१ सप्टेंबर २०२१ या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हा व दृष्टी फाऊंडेशन घेऊन येत आहे ( सेल्फी विथ बाप्पा २०२१ Selfie with Bappa 2021 ) स्पर्धा Coronavirus साथीच्या काळातही तुमच्या गणपतीचं दर्शन जगाला होईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त एवढं करायचं की, बाप्पाबरोबरचा सेल्फी पाठवायचा. जास्तीत जास्त ३ पाठवायचे. तुमचा सगळा परिवार या फोटो बाप्पासह दिसला तर उत्तमच. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8369100928 / 8691886339 वर वाॅटसअँपवर तुमचं संपूर्ण नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून बाप्पा सोबत तुमचे फोटो अपलोड करा. हे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची निवड करण्यात येईल.
स्पर्धेसाठी फोटो फक्त 8369100928 / 8691886339 या वॉटस्अँप वर स्वीकारले जातील, अशी माहिती सामाजिक न्यायविभाग पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष किशोर देवधरकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल पुरस्कृत ‘सेल्फी विथ बाप्पा २०२१ स्पर्धा ‘ !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




