Press "Enter" to skip to content

शासनाने दिलेले कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून गणेशोत्सव साजरा करावा ! भाजप युवानेते कुणाल महाडिक !

नवी मुंबई : शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून सर्व नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा, आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजप युवा मोर्चा नेरुळ मंडळाचे अध्यक्ष तथा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, नेरुळ सेक्टर ११’ १५ , २९ चे अध्यक्ष कुणाल महाडिक यांनी केले आहे. नेरुळची माऊली नावाने मागील २२ वर्षांपासून नेरुळ पूर्वेला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. नेरुळ येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंड राखण्यात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई सचिव तथा धर्मशास्त्रभक्त वृंद चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्थ आणि जय आंबे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश महाडिक यांचे मोठे योगदान आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »