खारघरचा राजा गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम !
नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा : वनिता पाटील !
पनवेल : खारघरचा राजा गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खारघरचा राजा ट्रस्टचे संस्थापक- अध्यक्ष विजय पाटील यांच्या पुढाकाराने आणि डॉक्टर श्वेता होमिओपॅथी हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघरवासीयांसाठी १० दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आरोग्य शिबिराची सुरुवात गणेशाच्या आगमनाप्रसंगी करण्यात आली. खारघर मधील नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्या, असे आवाहन खारघरचा राजा ट्रस्टचे संस्थापक – अध्यक्ष विजय पाटील आणि श्री समर्थ महिला मंडळ अध्यक्षा तथा भाजप खारघर शहर महिला अध्यक्षा वनिता पाटील यांनी केले आहे.





