१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजन !
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका व आरोग्य विभाग यांच्यामाध्यमातून आणि नगरसेवक सुनील पाटील यांचा पुढाकाराने सिवुड्स-दारावे येथे कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. दारावे येथील गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयात संपन्न झालेल्या सदर शिबिरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस देण्यात आला.





