Press "Enter" to skip to content

आर जे पॅपिलॉनची यशाकडे वाटचाल ! ३ रा वर्धापन दिन उत्साहात संपन्न !

  • गोव्यासह महाराष्ट्रात ५ शाखा कार्यरत !
  • समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करायचे आहे : आर जे पॅपिलॉन ग्रुपचे चेअरमन रमेश जोशी !

डोंबिवली : आर जे पॅपिलॉन ग्रुप ऑफ कंपनीचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात डोंबिवली येथील मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला. आर जे पॅपिलॉन ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना तीन वर्षांपूर्वी करण्यात आली. कोकणपुत्र रमेश जोशी हे आर जे पॅपिलॉन ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन आहेत. आर जे पॅपिलॉन ग्रुपमध्ये आर जे पॅपिलॉन मल्टीट्रेड प्रा.लि, आर जे पॅपिलॉन निधी लिमिटेड आणि आर जे पॅपिलॉन कार्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांचा समावेश आहे.

आर जे पॅपिलॉन मल्टीट्रेड प्रा.लि हि कंपनी प्रोडक्शनवर काम करते. सध्यस्थितीत कंपनीकडे ३२ प्रकारचे प्रोडक्ट आहेत. भविष्यात शंभर प्रोडक्ट करण्याचा कंपनीचा संकल्प आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आर जे पॅपिलॉन निधी लिमिटेड हि कंपनी काम करते. या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करतात. डोंबिवलीतून आरंभ केलेल्या आर जे पॅपिलॉन ग्रुप ऑफ कंपनीने गोव्यासह महाराष्ट्रात नेरळ, दापोली, मंडणगड आणि हर्णे येथे देखील शाखा सुरु करण्यात यश मिळविले आहे.

समाजातील सामान्य आणि शेवटच्या घटकापर्यंत काम करायचे आहे. भविष्यात आर जे पॅपिलॉन निधी लिमिटेड कंपनीचे एका राष्ट्रीय बँकेत रूपांतर करण्याचे स्वप्न आहे, अशी भावना आर जे पॅपिलॉन ग्रुपचे चेअरमन रमेश जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »