पनवेल : सालाबादप्रमाणे यंदा देखील खारघरचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने खारघर येथे गणेशोत्सव संपन्न होत आहे. गणेशोत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा काळ असल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करून फक्त जनसेवा कण्याचा आमचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया खारघरचा राजाचे संस्थापक – अध्यक्ष विजय पाटील यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
गणेशोत्सवादरम्यान डॉ श्वेता`ज होमिपॅथी हॉस्पिटलच्या सयुंक्त विद्यमाने १० ते १९ सप्टेंबर पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिसंगीताची मैफिल देखील रंगणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.






