Press "Enter" to skip to content

सामाजिक उपक्रमाद्वारे योगेश निपाणे यांचा वाढदिवस साजरा !

खारघर येथे मास्क व फळवाटप !
लहान मुलांना बिस्कीट !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक आणि खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निपाणे यांचा वाढदिवस खारघर मध्ये विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने खारघर येथे मास्क व फळवाटप आणि लहान मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेक्टर १५ अध्यक्षा निता निपाणे, माजी राज्यमंत्री तथा यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस खारघर शहर माजी अध्यक्ष सुरेश रांजवण, ओबीसी सेल माजी जिल्हाध्यक्ष विजय मयेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष सुनील ठोंबरे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »