Press "Enter" to skip to content

खारघर सेक्टर १५ येथे हायमास्ट लाइट्सचे लोकार्पण ! नगरसेवक निलेश बाविस्कर यांचा पुढाकार !

सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न !
खारघर सेक्टर १५ परिसर झाला प्रकाशमय !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर प्रभाग क्रमांक ६ मधील सेक्टर १५ येथे हायमास्ट लाइट्सचे लोकार्पण करण्यात आले. पनवेल मनपाचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते हायमास्ट लाइट्सचे उदघाटन संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने सदर हायमास्ट लावण्यात आले. खारघर सेक्टर १५ मधील घरकुल- गुडविल सोसायटी चौक आणि स्पॅगेटी सोसायटीच्या चौकात हायमास्ट लाईट्स लावण्यात आल्या आहेत. हायमास्ट लाईट्समुळे खारघर सेक्टर १५ परिसर आणि येथील रस्ते प्रकाशमय बनल्याने रहिवाशांनी नगरसेवक निलेश बाविस्कर यांचे आभार मानले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »