महेश लंकेश्वर / मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र कमिटी सदस्य आणि रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष सुमित वजाळे यांचा वाढदिवस रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या वतीने मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला.
हॉटेल बिंद्रा बिल्डिंग न.२, रोड न.११, एम आय डी सी. अंधेरी (पूर्व) ऑप कट्ट्यानी रेसिडेन्सी, मुंबई या ठिकाणी सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, प्रवक्ते सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाशजी महातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीस रवींद्र युवराज कांबळे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष मकदुम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी रिपब्लिकन रोजगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अमित तांबे यांच्या कार्यालयात केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला. उर्वांकुर एसी हॉल, ५०२ यच क्यू बिल्डिंग ५ वा. माळा, चेतना कॉलेज च्या बाजूला, डॉ.आंबेडकर गार्डनच्या समोर शास्त्रीनगर, वांद्रे (पूर्व) मुंबई ५१,येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतमभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली केक कापून,आणि विविध मान्यवारांकडून शाल व पुष्पगुच्छ घेऊन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी शूभेच्छा दिल्या. यावेळी भीमराव कांबळे उपाध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपाइं मुंबई प्रदेश सचिव व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे यांनी केले.

सुमित वजाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम





