Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक : योगेश निपाणे !

सर्वसामान्य जनतेसाठी सदैव धावून जाणारा धडपड्या कार्यकर्ता म्हणजे खारघर शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश निपाणे होय. योगेश निपाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून खारघर शहरात सक्रिय आहेत. यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे ते पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आहेत. नवी मुंबई माहिती अधिकार कार्यकर्ता समाजसंघ खारघर अध्यक्ष पदरावर कार्यरत आहेत. विविध पदांवर कार्यरत असताना पदाचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्याची जाणीव योगेश निपाणे यांच्यात असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीत कळते.
खारघर शहरात काम करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असते. पक्ष संघटनेच्या वाढीत आपला खारीचा का होईना वाटा असला पाहिजे हि त्यांची कायम भूमिका असते. त्यांच्या राजकारणाला सदैव समाजकारणाची किनार आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीला कोकण दर्पण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा !

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »