Press "Enter" to skip to content

ट्रान्सग्लोबल संस्थेचा प्रथम वर्धापनदिन साजरा ! केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती !

पनवेल : ट्रान्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चर (टेकिया) या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता- राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर,नवी मुंबई येथे संपन्न झाला.
यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, जयेश खाडे, दीप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तसेच आपल्या व्यवसायाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याऱ्या उद्योजकांना एक नवीन ओळख,नवा मार्ग देण्यासाठी चेंबर नेहमी मदतगार असतो.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री आठवले यांनी चेंबरच्या वर्षपूर्ती निमित्ताने चेंबरला शुभेच्छा दिल्या. भारतामध्ये आर्थिक विकास करावयाचा असेल तर असे चेंबरच्या मदतीनेच ते शक्य होईल.चेंबरचा प्रवास हा आर्थिक सबलीकरणाच्या मार्गाचा आहे आणि यामुळे नवीन व्यावसायिक निर्माण होतील ह्यात शंका नाही असे त्यांनी सांगितले.आपल्यासाठी सदैव सोबत असेल.जिथे माझी गरज असेल येथे मी आपणांस मदत देईन असेही आश्वासन दिले.पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड आपल्या सदिच्छापर भाषणात सांगितले की,असे व्यवसायिक निर्माण होणे गरजेचे आहे.त्यातुनच आपली प्रगती होईल.आपले काम नक्कीच अभिमानस्पद आहे.आपल्या हातून नवीन उद्योजक तयार होत आहेत आणि असेच होत राहावे हीच ईच्छा प्रकट केली.माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले की,आम्ही राजकारणात असे उपक्रम राबवू शकलो नाही आणि राबविले तरी कोणी उपस्थित राहणार नाही मात्र आपण अशा चेंबर द्वारे जे काम करत आहात ते खूपच सुंदर आहे.सरकारी मदतीसाठी आम्ही सोबत आहोत.आज समाजामध्ये असे उद्योजक तयार होणे गरजेचे आहे.
फादर एग्रेल कॉलेज चे प्राचार्य मंगेश मोहन यांनी कमी पैशामध्ये आपल्या कॉलेजमध्ये सर्व सामन्यासाठी सुविधा आहेत.आपण त्यांचा फायदा घेण्याचे आवाहन केले.आपण पुढील सर्व काळासाठी चेंबर सोबत जात आहोत असे जाहीर केले.येस बँकेचे व्यवसाय प्रमुख आद.दीप सिंह यांनी आपण चेंबर सोबत भविष्यात काम करण्यासाठी सुमारे पाचशे करोडचा करार केलेला आहे त्याचा आपण सर्व व्यवसायिकांनी चेंबरच्या मदतीने ह्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.बी.ए.आर.सी.चे एम.डी.वैज्ञानिक अधिकारी डॉ.मिलिंद लंकेश्वर यांनी आपण यापुढे चेंबर सोबत काम करणार असल्याचे सांगितले.हेमंत सुटे(शिक्षण नियोजन आणि समुपदेशन),अभिनेत्री कोमल धांडे,लोक जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष रवी गरुड,रिलायन्स जीआयसी चे व्यवसाय प्रमुख रोहित मुक्कर यशा दिग्गज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली.सुमारे तीन तास चाललेल्या ह्या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचे काम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी त्यांच्या वैचारिक वाणीने अत्यंत सुसूत्रतेने केले.कार्यक्रमाची सुरुवात चेंबरचे प्रमुख सल्लागार किरण राणे यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
चेंबरच्या माध्यमातून आपली मासोळी आणि सब्बा केअर अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड(सॅनिटरी नॅपकिन) हे दोन व्यवसाय फ्रेच्याइसी मॉडेल रूपाने मार्केटसाठी सुरू करण्यात आले.चेंबरची माहिती देणारे ब्रोशर श्री आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.चेंबरच्या सर्व टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »