- सर्व झोपडपट्ट्यांना घरपट्टी लागू होणार !
- वाढीव घरपट्टी कमी होणार !
- रिपब्लिकन सेना आणि संघर्ष समितीचे नेतृत्व !
नवी मुंबई : नवी मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मूलभूत सुविधा द्याव्यात, पाणी पुरवठ्यासह सर्व झोपड्यांना घरपट्टी द्यावी, वाढीव घरपट्टी कमी करावी, अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेना नवी मुंबई आणि घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेला धडक मोर्चाचा गर्भित इशारा दिल्यानंतर पालिका प्रशासनाने नमते घेत झोपडपट्टी धारकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानिमित्ताने रिपब्लिकन सेनेच्या वतीने वाशी येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष खाजामिया पटेल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र प्रमुख सागर डबरासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात रिपब्लिकन सेनेच्या नेत्यांनी झोपडपट्टीधारकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सागर डबरासे रिपब्लिकन सेना, महाराष्ट्र प्रमुख, युवराज धसवाडीकर रिपब्लिकन सेना, महाराष्ट्र उपाध्यक्ष, हिरामण पगार
अध्यक्ष, घर हक्क संघर्ष समिती, खाजामिया पटेल रिपब्लिकन सेना, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आदींनी मार्गदर्शन केले.





