-पनवेल मनपाच्या माध्यमातून खारघर येथे कोविड लसीकरण !
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने खारघर येथे आयोजित केलेल्या तिनदिवसीय कोविड लसीकरण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
पनवेल मनपा खारघर प्रभाग क्रमांक ४, रामशेठ ठाकूर शाळा सेक्टर १९ येथे आयोजित केलेल्या विशेष कोविड लसीकरण शिबिरात घरकाम करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षकांना कोविडची लस देण्यात आली. यावेळी सामाजिकनेते किरण पाटील, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, डॉ वर्तिका कोटनाला, डॉ रोमा म्हसकर आदी उपस्थित होते.







