पनवेल : सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या तळोजा येथील नवी मुंबई मेट्रो कारशेडचे काम पूर्णत्वास आले तरी अद्याप एकही सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी, रोजगार देण्यात आलेला नाही. स्थानिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळोजा येथील मेट्रो कार शेड येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मेट्रो प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना भेट न दिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी तळोजा येथील मेट्रो कारशेडमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना मज्जाव करीत ताब्यात घेतले.

नवी मुंबई मेट्रो कारशेडमध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगार द्या ! आमदार प्रशांत ठाकुर यांचा निर्वाणीचा इशारा !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




