- लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपनेते बाळासाहेब पाटील
- आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा !
पनवेल : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून संपन्न झाला. पनवेल मनपाच्या खारघर प्रभाग क्रमांक ६ मधील स्थानिक नगरसेविका संजना समीर कदम यांच्या माध्यमातून सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा भाजपनेते बाळासाहेब पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जेष्ठ नगरसेवक हरेश केणी, नमो नमो भारतचे संतोष शर्मा, भाजप खारघर शहर चिटणीस दीपक शिंदे यांच्यासह संपूर्ण खारघर आणि पनवेलमधील नागरिकांनी समीर कदम यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
वास्तुविहार आणि सेलिब्रेशन सोसायटीमधील रहिवाशी आणि जेष्ठ नागरिक यांनी समीर कदम यांचे वाढदिवसानिमित्ताने विशेष कौतुक केले. पनवेल मनपा प्रभाग क्रमांक ६ खारघर विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये कोरोना कोविड १९ प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली. वास्तुविहार सेक्टर १६ येथे तसेच सेलिब्रेशन सोसायटी सेक्टर १७ येथील चौपाटीवर श्रमिक सेवा सहकारी संस्थेच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका संजना कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री साई गणेश जनसेवा केंद्रचे उद्घाटन करण्यात आले. याद्वारे सीएसीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना याठिकाणी कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून आधार कार्ड दुरूस्ती, पॅनकार्ड दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिक कार्ड, पासपोर्ट व दुरूस्ती, दिव्यांगांना यूडी आयडी कार्ड, मनी ट्रान्सफर, वीज बिल, मोबाइल बिल सेवा, रेल्वे तिकीट, एअर तिकीट, एमएसएमई रजिस्ट्रेशन, अटल पेन्शन योजना, उज्ज्वला गॅस योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रमयोगी मानधन योजना, जनधन योजनांबाबत सेवा पुरविली जाणार आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले योजना प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आले.











