प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. एनआरआय सागरी पोलीस ठाण्याला मिळालेल्या या गौरवाबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी विशेष कौतुक केले. पहिल्यांदाच आयएसओ मानांकन मिळविण्याचा बहुमान एनआरआय सागरी पोलीस ठाण्यास मिळाल्याबद्दल पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
एनआरआय सागरी पोलीस ठाण्याची लोकाभिमुख कार्यप्रणाली आणि पोलिसांचा जनतेशी चांगला संवाद, पोलीस ठाण्यातील स्वछता, पोलीस ठाण्यातील बैठक व्यवस्था, तक्रार करण्यास आलेल्या व्यक्तीला योग्य सहकार्य आणि मार्गदर्शन, तक्रारीची योग्य दखल, फायर फायटिंग, पेंडंसी, वाहन पार्किंची सुविधा अशा कार्यपद्धतीमुळे एनआरआय सागरी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे.





