Press "Enter" to skip to content

दापोली येथे बहुविकलांग दिव्यांग मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र !

दापोली : बहुविकलांग दिव्यांग (मतिमंद) मुलांच्या जीवनात आनंद फुलावा त्यांना समाजप्रवाहात आणावे या सामाजिक जाणीवेतून दापोलीतील सुप्रसिद्घ “किशोर फर्निचरचे मालक हसमुखशेठ जैन, शुभांगी वसंत गांधी, रामराजे संस्थेचे सर्वेसर्वा संदीपजी राजपुरे, सौ. बागुल, माहेश्वरी विचारे, समीर गांधी, करमरकर शीतल देवरुखकर” आदि सर्वांनी मिळुन दापोली शहराजवळ जालगाव येथे बहुविकलांग दिव्यांग (मतिमंद) मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.

या केंद्राचे उद्घाटन जालगांवचे उपसरपंच “विकासजी उर्फ बापु लिंगावळे, संस्थेचे संचालक हसमुखशेठ जैन,गांधी मॅडम यांचे हस्ते १५ ऑगस्ट रविवारी सकाळी १०:३० वाजता करणेत आले याप्रसंगी भिकुजी उर्फ दादा इदाते यांनी दिल्ली कार्यालयातुन फोनवरुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी दापोली पं.स.सभापती योगिता बांद्रे,उपसभापती मनोज भांबीड, जिप.सदस्य व माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर, माजी सभापती किशोर देसाई, भाऊ इदाते,लायन्स क्लब अध्यक्ष चेतनशेठ जैन,जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मंडलिक,युवासेनेचे ऋषी गुजर,विरु लिंगाषळे, विकास व उमेश जाधव ,स्नेहदीप संस्थेचे अध्यक्षा अधिकारी मॅडम, उपाध्यक्षा सुर्वे मॅडम,खजिनदार मनोहर जैन,संचालिका मंगलताई सणस, नंदकिशोर भागवत, डॅा.नेहा मेहता,ञानदीप संस्थेचे सुजय मेहता,गोपळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया,खेडचे प्रकाशशेठ जैन, महेंद्र शेठ,जालगांव ग्रामपंचायत सदस्य विनोदजी आवळे, मिलिंद शेठ,गोळे काका,प्रशांत परांजपे,आशिषभाई व प्रसाद मेहता,मंदार केळकर, महेश योगेश धर्मेंद्र प्रविण किशोर महेंद्र, राजुभाई,हितेन,प्रथमेश,मनोहरकाका व राजेशभाई जैन,मुसळोणकर गुरुजी, राजेंद्र बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंडलिक व विचारे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन राजपुरे यांनी केले. पालक सौ. सावंत यांनी हि दापोली तालुक्याची गरज होती, नॅार्मल मुलांसाठी दापोली तालुक्यात अनेक शाळा आहेत, मुकबधीर मुलांसाठीही आहे, अंधशाळा देखील आहे, परंतु दिव्यांगांसाठी शाळा नव्हती ती संचालक हसमुख जैन, गांधी मॅडम, बागुल मॅडम, विचारे मॅडम, संदिपजी राजपुरेसर व त्यांचे सहकारी संचालक यांनी सुरु केल्याबद्दल त्यांचे खुप खुप आभार मानले. सध्या या केंद्रात १५ विद्याथ्यांनी प्रवेश घेतला असुन सोमवार ते शनिवार जालगांव बाजारपेठ येथे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी व अधिक माहितीसाठी 9422382620 किंवा 99223 35326 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करणेत आले आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »