पनवेल : सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. स्पर्धा परीक्षांचे आव्हान स्वीकारून देशाच्या जडणघडणीत आपले योगदान देण्यासाठी तयारी दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूरदासदादा गोवारी यांनी कोमोठे येथील कार्यक्रमात विध्यार्थाना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहराच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या वर्गात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कामोठे येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सूरदास गोवारी यांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पनवेल शहरजिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादी कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी विध्यार्थी संघटनेचे इतर पदाधीकारी, सदस्य, विध्यार्थी, पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारावे : सूरदास गोवारी !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




