Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर संपन्न ! खारघर युवाप्रेरणा संस्थेचे आयोजन !

  • टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिर !
  • ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान !
  • दीपक शिंदे यांच्या रक्तदानाचे अर्धशतक पार !

पनवेल : खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनी ११ वे रक्तदान शिबिर रामशेठ ठाकूर शाळा, सेक्टर १९ ,खारघर येथे संपन्न झाले.

या वर्षीच्या शिबिरात माहेश्वरी प्रगती मंडल, खारघर यांनी देखील सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिराला पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अध्यक्ष युवा प्रेरणा किरण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, माहेश्वरी प्रगती मंडळ सेक्रेटरी व्यंकट बाओरी, रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री, माजी पोलीस अधिकारी शिवाजी पाटील , ​भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल, भाजप रायगड जिल्हा सचिव गीता चौधरी, खारघर मंडल उपाध्यक्ष बिना गोगारी, सोशल मीडिया रायगड जिल्हा संयोजक मोना अडवाणी, खारघर भाजप उपाध्यक्ष दिलीप जाधव व इतर मान्यवर यांनी उपस्थित राहत रक्तदात्यांचे मनोबल वाढवत शुभेच्छा दिल्या.शिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. रक्तदानाचे अर्धशतक पार करणारे रक्तदाते दीपक शिंदे यांनी या शिबिरात रक्तदान करून ५५ वि रक्तदान केल्याची नोंद केली. सदर शिबिराचे आयोजन पनवेल महानगरपालिका नगरसेविका नेत्रा किरण पाटील व त्यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »