पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शनिवारी कोपरा -खारघर येथे मोफत कोविड लसीकरण शिबीर संपन्न झाले. स्थानिक नगरसेवक नरेश ठाकूर यांच्या पुढाकारातून सदर लसीकरण माहीम राबविण्यात आली.
पनवेल मनपा प्रभाग क्रमांक ६ कोपरा- खारघरमध्ये मोठी लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना कोविड लसीकरण करता यावे, म्हणून स्थानिक नगरसेवक नरेश ठाकूर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शनिवारी कोपरा येथील समाज मंदिर हॉलमध्ये आयोजित आयोजित केलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत कोपरा गाव, खारघर सेक्टर ८ आणि १० तसेच खारघरमधील नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी भाजप सोशल मीडिया नेत्या मोना अडवाणी उपस्थित होत्या.

पनवेल मनपाच्यावतीने कोपरा येथे कोविड लसीकरण संपन्न ! नगरसेवक नरेश ठाकूर यांचा पुढाकार !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




