पनवेल : युवाप्रेरणा सामाजिक संस्था ,खारघर ही विविध समाजपयोगी उपक्रम वर्षभर राबवत असते. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सर रुग्णांसाठी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी संस्थेचे ११ वे रक्तदान शिबिर साजरे केले जाणार आहे. कॅन्सर रुग्णांची रक्ताची गरज लक्षात घेता टाटा हॉस्पिटल, खारघर साठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या बरोबर माहेश्वरी प्रगती मंडळ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल मध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत करण्यात येणार आहे . शहरातील रक्तदात्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.

युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने रक्तदान शिबिरराचे आयोजन !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




