कोकण दर्पण ! कोकण Live
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे येथील भूमिपुत्र कन्या अश्विनी सूरदास गोवारी डॉक्टर बनली आहे. डॉ. अश्विनी गोवारी हिने यावर्षी बीएएमएस हि वैद्यकीय पदवी उत्तीर्ण केली आहे. आयुर्वेदामध्ये डॉ अश्विनी हिने आपला बीएएमएस पदवीचा अभ्यास पूर्ण केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास पुढे सुरु ठेवून आयुर्वेदातील एमडी पदवीचे शिक्षण घेण्याचा संकल्प डॉ अश्विनी हिने व्यक्त केला आहे.
डॉ अश्विनी पनवेल मधील राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षण सम्राट सूरदास गोवारी यांची कन्या आहे. एका भूमिपुत्राने आपल्या कन्येला डॉक्टर पदवीचे शिक्षण दिले, हि भूमिपुत्रांसाठी गौरवाची बाब आहे.






