नवी मुंबई : नवी मुंबईतील नामांकित हृद्यरोग तज्ज्ञ डॉ केशव काळे यांची रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिक्युटिव्हच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रविवारी सीबीडी- बेलापूर येथे संपन्न झालेल्या रोटरी क्लबच्या एका विशेष कार्यक्रमात डॉ केशव काळे यांची निवड करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून सीबीडी येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये जेष्ठ हृद्यरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ केशव काळे यांची नवी मुंबईच्या सामाजिक पटलावर एक सामाजिक जाणिवेचे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी नेहमीच सामाजिक भान आणि जाणीव राखली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करीत असताना डॉ केशव काळे यांच्यावर रोटरी क्लब ऑफ खारघर एक्झिक्युटिव्हच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आज देण्यात आली आहे.





