पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदासदादा गोवारी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आपला वाढदिवस समाजाच्या उपयोगी पडला पाहिजे म्हणून कामोठे येथील डी जी गोवारी स्कुल अँड कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले आणि आपले सामायिक दायित्व सिद्ध केले.
सूरदासदादा गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, आजिनाथ सावंत, युवक अध्यक्ष प्रमोद बागल तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.






