Press "Enter" to skip to content

कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पनवेल मनपा सरसावली !

  • १३५ स्वछता कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत !
  • महाड, चिपळूण, खेड येथील नागरिकांना दिलासा !
  • पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख स्वतः घटनास्थळी !

पनवेल : कोकणातील पूरग्रस्तांसाठी पनवेल महानगरपालिकेने मदतीचे मोठे कार्य केले. १३५ स्वछता कर्मचाऱ्यांचे पथक पाठवून महाड, चिपळूण, खेड येथील नागरिकांना दिलासा दिला. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख स्वतः घटनास्थळी पोहचले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पीडितांना मदतीचा हात दिला.

पनवेल मनपाचे १३५ कामचारी, २ जेसीबी, ४ डम्पर, ६ फॉगिंग , ३ स्प्रेयिंग व्हेईकल, १ जेटिंग, २ फायर व्हेईकल, १० हजार बिस्कीटपुढे, १० हजार पिण्याच्या बॉटल्स, ७०० किलो डस्टिंग पावडर पनवेल मनपाच्या वतीने पाठविण्यात आले. पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी कोकणात स्वतः जाऊन ३० व ३१ जुलै आणि ,१ ऑगस्ट रोजी मदतकार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »