पनवेल : खारघर सेक्टर २० येथील पोलारीस हॉस्पिटलमध्ये कोरोना संसर्गजन्य लसीकरणाचा सुरवात स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या शुभहस्ते व भाजपा खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पोलारीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ अजिंक्य भंडारी, डॉ अतुल खरात व इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस शासकीय दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी यावेळी केले.

पोलारीस हॉस्पिटलमध्ये नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या शुभहस्ते कोरोना लसीकरण सुविधेचा शुभारंभ !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




